About Us
विशेष बाल पथक
विशेष बाल पोलीस पथक, गुन्हे शाखा juvenile Justice Care & Protection Act 2015 या कायदयामधील कलम 107 अन्वये विशेष बाल पोलीस पथकाची स्थापना करण्यात आली असून विशेष बाल पोलीस पथकामार्फत खालील कामकाज करण्यात येत आहे. 1) पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत सर्व पोलीस ठाणे स्थरावर दाखल गुन्ह्रातील विधीसंघर्षित बालकांची माहिती संकलीत करून मा.विशेष पोलीस महानिरीक्षक साो, महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग, मुंबई यांना दर महिण्याला मंथली व सहामाही स्वरुपात पाठविण्यात येते. 2) विशेष बाल पोलीस पथकाव्दारे पोलीस ठाणे स्थरावर दाखल गुन्ह्रातील विधीसंघर्षित बालकांचे मानसोपचार तज्ञ, डॉक्टर यांचे मार्फतीने - संवाद सेंटर आकुर्डी, काळभोर नगर येथे समुपदेशन व मार्गदर्शन करुन त्यांना शिक्षण, रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून अशा बालकांचे पुनर्वसन करून मुख्य प्रवाहात आणण्यात येत आहे. 3) पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत सर्व पोलीस ठाणेकडील विशेष बाल पथकास नेमणूकीस असलेले बाल कल्याण पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेकरिता वेळोवेळी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करून बालकांसदर्भातील सर्व प्रचलीत कायद्यांची माहिती देवून गुन्हेतपासाबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. 4) विशेष बाल पोलीस पथकाच्या विशेष उपक्रमांतर्गत गुन्हेगारी मार्गावरील दिशा भरकटलेल्या बालकांना मुख्य ्प्रवाहात आणण्याकरिता पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे मालकीचे दोन खेळाचे मैदाण उपलब्ध करून घेण्यात आले असून सदर मैदानामध्ये या बालकांना तज्ञ क्रिडा प्रशिक्षकाव्दारे विविध खेळाचे क्रिडा प्रशिक्षण देण्यात येत आहे. 5) याचबरोबर विशेष बाल पोलीस पथकाचे मार्फतीने निगडी सेक्टर नं.22 येथे व्यसनमुक्ती समुपदेशन केंद्र कार्यान्वयीत करण्यात आले असून येथे व्यसनाच्या आहारी गेलेल्या बालकांसाठी तज्ञ डॉक्टरांच्या मार्फतीने व्यसनमुक्ती बाबत समुपदेशन करून औषधोपचार करण्यात येत आहे. 6) पुढील काळात विधीसंघर्षित बालक तसेच गुन्हेगारी मार्गावरील दिशा भरकटलेल्या बालकांसाठी औद्योगिक संस्थांच्या मदतीने रोजगार मेळावे तसेच महाराष्ट्र उद्योजगता महामंडळाच्या वतीने कर्ज मेळावे घेवून या बालकांचे पुनर्वसन करण्याची तजविज ठेवण्यात आली आहे.