About Us
पासपोर्ट विभागाकडील माहिती
१. भारतीय पासपोर्ट मिळणेसाठी अर्जदाराने पासपोर्ट सेवा केंद्र (passportindia.gov.in) येथे ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर सदरचा अर्ज प्रादेशिक पारपत्र कार्यालय (आर.पी.ओ.) कडून पोलीस आयुक्त कार्यालय अंतर्गत येणाऱ्या संबंधीत पोलीस स्टेशन येथे ऑनलाईन पाठविला जातो.आणि स्थानिक पोलिस ठाण्याकडुन पडताळणी करून अहवाल अंतिम पडताळणीसाठी पोलीस आयुक्त कार्यालय येथे पाठवला जातो. येथुनच अर्जाबाबतचा अहवाल प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय येथे ऑनलाइन पाठविला जातो. व त्या (आर.पी.ओ.) कार्यालया मार्फत अर्जदारांना पारपत्र दिले जाते.
२.अर्जदाराने पासपोर्ट सेवा केंद्र( passportindia.gov.in ) येथे ऑनलाईन पी.सी.सी (Police Clearance Certificate) मिळणेकामी केलेल्या अर्जाची वरील प्रमाणे पडताळणी करून अहवाल प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय येथे ऑनलाइन पाठविला जातो. व त्या कार्यालया मार्फत अर्जदारांना पी.सी.सी दिले जाते.
३.परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी तेथील भारतीय दूतावास येथे नोरी (NORI-NO OBLIGATION RETURN TO INDIA ) प्रमाणपत्र मिळणेकामी सादर केलेला ऑनलाईन अर्ज मा. गृहमंत्रालय, महाराष्ट्र शासन यांचे मार्फतीने इकडील पोलीस आयुक्त कार्यालयास प्राप्त होऊन अर्जाची वरील प्रमाणे पडताळणी करून सदरचा अहवाल मा. गृहमंत्रालय,महाराष्ट्र शासन यांना ऑफलाईन पद्धतीने पाठविला जातो. व तेथुनच सबंधित दुतावासास ऑनलाईन पद्धतीने पाठविला जातो.
चारित्र्य पडताळणी विभाग
या विभागामार्फत शासकीय प्रकरणे (ऑफलाईन पडताळणी केली जाते ) वगळता खालील बाबींकरीता ( pcs.mahaonline.gov.in) या वेबसाइट वरून ऑनलाईन सादर केलेल्या अर्जावर पडताळणी करून ऑनलाईन प्रमाणपत्र दिले जाते.
१) शासकीय प्रकरणे (ऑफलाईन पद्धतीने )
२) निम-शासकीय प्रकरणे (बँका ,निगम ,लि .कंपन्या शासनपुरस्कृत ,निमशासकीय संस्था ) इत्यादींतील कर्मचारी यांची चारित्र्य पडताळणी केली जाते.
३) सिक्युरिटी गार्ड
४) खाजगी कंपनीतील कर्मचारी /अधिकारी
५) शासनातर्फे किंवा शासनपुरस्कृत संस्था यांचेकडून दिला जाणारा पुरस्कार विजेते व्यक्तींची तपासणी.
६) अवयव प्रत्यारोपनांसाठीचे व्यक्तींची पडताळणी
७) नागरिक डिजिटल सुविधा,अल्पबचत एजन्ट / व्यासायिक इत्यादी ,
८) परदेशास जाणाऱ्या व्यक्तींना / नागरिकांना त्यांनी ( pcs.mahaonline.gov.in वरील Police Clearance Certificate-Abroad ) वेबसाईट