About Us
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखणेकरीता पोलीस नियंत्रण कक्षाची महत्वाची भुमिका असते. त्या करीता आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशन, विविध शाखा, मुख्यालय यांचेशी समन्वय ठेवणे तसेच आयुक्तालयातील सर्व महत्त्वाच्या घडामोडीबाबत वरिष्ठांना अवगत करणे, नियंत्रण कक्ष कायदा व सुव्यस्थेचे देखभाल सुनिश्चित करते. पोलिस आयुक्तालयाचे हद्दीत कोठेही काही अप्रिय/अनुचित घटना घडल्यास तात्काळ माहिती प्राप्त करून घेऊन वरिष्ठांना अवगत करणे, त्यांचे सुचनांप्रमाणे संबंधित सर्व पोलीस यंत्रणांना घटनास्थळी रवाना होणेबाबत समन्वय ठेवणे, मदतीकरीता अतिरिक्त मनुष्यबळ, वाहने, साधनसामुग्री इ. आवश्यकतेनुसार पुरवणेकरीता समन्वय ठेवणे. घटनेचे गांभिर्य ओळखून तात्काळ निर्णय घेऊन कार्यवाही घेणे ही कामे नियंत्रण कक्षामार्फत अहोरात्र सुरु असतात.
पोलीस नियंत्रण कक्ष येथे नागरिकांकरिता विविध हेल्प लाईन्स उपलब्ध करून देण्यात आले आहे .
डायल 112 प्रणाली:- माहे सप्टेंबर 2021 पासून पिंपरी चिंचवड आयुक्तालय 112 डायल यंत्रणा सुरू झाली आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये नागरिकांना अडचणीचे वेळी तात्काळ पोलीस मदत व्हावी त्या अनुषंगाने डायल 112 ही अद्यावत कार्यप्रणाली कार्यरत आहे. मुख्य नियंत्रण कक्ष पिंपरी चिंचवड हे पूर्णपणे संगणकीकृत आहे. डायल 112 करिता 7 संगणक संच बसविण्यात आले असून 1 सुपरवायझर करिता 1 संच महिंद्रा इंजिनिअरिंगकरिता, व 5 संच हे कॉल डिस्पॅच करणे करता बसविण्यात आलेले आहे नवी मुंबई कॉल सेंटरकडून प्राप्त झालेले कॉल रीड करून संबंधित पोलीस ठाणेला ताबडतोब डिस्पॅच केला जातो. व संबंधित ई.आर.व्ही ऑपरेटरने पाहिला नाही तर त्याला फोन द्वारे वायरलेद्वारे कळविले जाते. एखाद्या कॉल चे वेळी जवळची गाडी संगणकावर दिसून येत नसेल तर सदरचा कॉल हा वायरलेस द्वारे दिला जातो. व तशी नोंद कॉल डाटा ए.टी.आर मध्ये केली जाते. सदर कार्यप्रणालीवरच आता इ आर व्ही ही सिस्टीम बसविण्यात आलेली आहे. डायल 112 प्रणालीवर पिंपरी चिंचवड आयुक्तालयाकडे दैनंदिन 200 ते 250 कॉल प्राप्त होतात. व प्राप्त सर्व कॉल ची हाताळणी करण्यात येते. व कॉलर यांना 10 ते 15 मिनिटांचे आत संबंधित मार्शल यांचेकडून पोलीस मदत पोहोचविण्याचे प्रयत्न केले जातात.
फोन अ फ्रेंड :-हि सुविधा पोलीस नियंत्रण कक्ष याठिकाणी नागरिकांचा अभिप्राय घेण्याकरिता सुरु करण्यात आली आहे . पोलीस स्टेशन स्तरावर प्रत्यक्ष काम करणाऱ्या अधिकारी /कर्मचाऱ्यांकडून नागरिकांच्या तक्रारी अथवा अडचणींचे निराकरण केले जाते . त्यामुळे तक्रारदार नागरिकांचे समाधान झाले किंवा नाही . याबाबत आपले अभिप्राय नागरिक फोन अ फ्रेंड या सुविधेद्वारे कळवु शकतात. त्या करीता दुरध्वनी क्र.1) 020-27352500 2) 020-27352600 उपलब्ध आहेत.
जेष्ठ नागरिक व महिलांकरिता हेल्प लाईन :-जेष्ठ नागरिक व महिलाच्या मदतीकरिता दोन स्वतंत्र हेल्प लाईन क्रमांक नियंत्रण कक्ष येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत . सदर सुविधा हि २४ तास उपलब्ध असून त्याकरिता ,मनुष्यबळ पुरविण्यात आले आहे . जेष्ठ नागरिक व महिलांना प्राधान्याने प्रतिसाद देऊन आवश्यकतेनुसार तात्काळ मदत पुरविली जाते.
१) जेष्ठ नागरिक हेल्प लाईन क्र :- १०९०
२) महिलांकरिता हेल्प लाईन :- १०९१
३)नियंत्रण कक्ष व्हाट्सएप नं . :-९५२९६९१९६६