पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये महत्वाच्या,मोठ्या व संवेदनशील गुन्हे तपास करून ,उघडकीस आणणेकरिता गुन्हे शाखा निर्माण करण्यात आली गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी हे गंभीर गुन्हे तपासकामात सहभागी असतात,आणि संघटित गुन्हेगारीशी लढा देण्याकरिता रणनिती तयार करत असतात. त्यास खालील उपशाखा आहेत:
१) गुन्हे प्रतिबंध शाखा :- (PCB)
पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशन कडून गुन्ह्यांची व गुन्हेगाराबाबतची माहिती प्राप्त करून घेणे,व सर्व माहिती संकलीत करून महाराष्ट्र राज्याच्या,राज्य गुन्हे अभिलेख विभाग (SCRB) यांना आवश्यकतेनुसार पाठविण्यात येते.
२) दरोडा प्रतिबंध पथक :- मुख्यतः दरोडा ,जबरी चोरी, इ. प्रकारच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणेसाठी उपाययोजना करते ,तसेच घडलेले गुन्हे उघडकीस आणणे ह्या जबाबदाऱ्या दरोडा प्रतिबंध पथकामार्फत पार पाडल्या जातात . राज्य पोलीस दलामध्ये गुन्हे उघडकीस आणणेकरिता ही शाखा सर्वत्तम मानली जाते.
३) गुन्हे कार्यप्रणाली विभाग :-( MOB) गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांच्या कार्यप्रणाली बाबत ही शाखा माहिती प्राप्त करून घेते. गुन्हेगारांच्या कार्यपद्धतीविषयी सविस्तर अभिलेख तयार करून जतन करणे,गुन्हे कार्यप्रणालीची तपशीलवार नोंदी घेणे ,सराईत गुन्हेगार,रेकॉर्डवरील गुन्हेगार ,शिक्षा झालेले आरोपी ,न्यायालयीन कोठडीत असलेले गुन्हेगार इ .बाबत ची माहिती /अभिलेख तयार करणे ही महत्वाची कामे या शाखेमार्फत केली जातात .
4) गुन्हे शाखा युनिट १,२,३,४,५ महत्वाच्या मोठ्या व संवेदनशील गुन्ह्यांच्या तपासाचे काम पोलीस स्टेशन च्या समांतर कामकाजावरील गुन्हे शाखा युनिट्स मार्फत करण्यात येते.